वेगवान नाशिक
मुंबईः मागील काही दिवसांपूर्वी राज्यातील प्रकल्प बाहेर गेले होते. त्यानंतर आता ऊर्जा उपकरण निर्मिती झोन प्रकल्पही राज्याबाहेर गेल्याने पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून आरोप प्रत्यारोप सुरू होणार आहे. अशातच हा प्रकल्पही तत्कालीन ठाकरे सरकारच्या काळात महाराष्ट्राबाहेर गेल्याचा दावा शिंदे फडणवीस सरकारने केला आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना आर्थिक नियोजनासाठी उत्तम दिवस
त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले असून ते म्हणाले प्रत्येक वेळी प्रकल्प महाराष्ट्रातून गेला असा कांगावा करणं अतिशय चुकीचं आहे, यामुळे महाराष्ट्राची तर बदनामी होतेच पण जे अधिकारी यासाठी पाठपुरावा करतात आणि हा प्रकल्प आपल्याकडे यावा यासाठी प्रयत्न करतात तेही हतोत्साहित होतात. त्यामुळे अधिकारीही अर्ज सादर करावी की नाही. कारण उद्या तो प्रकल्प आला नाही तर तो महाराष्ट्रातून पळवला गेला अशा प्रकारचा कांगावा केला जाईल.
गुंतवणुकीस प्रोत्साहन देऊन राज्यातील बंदरे विकासाला गती देणार – मंत्री दादाजी भुसे
तसेच कोणतीही माहिती न घेता शिंदे फडणवीसांचे फोटो छापून टाकणं आणि जुन्या सरकारच्या काळात गेलेले प्रकल्प आमच्या नावाने दाखवणं तात्काळ बंद करण्याची विनंतीही फडणवीस यांनी केली आहे. तर केंद्र सरकार वेगवेगळ्या राज्यांमध्ये योजना करत असते, यासाठी सर्व राज्यांकडून प्रस्ताव मागवला जातो. मात्र यातील एक किंवा दोन राज्यांचा प्रस्ताव मान्य केला जात असल्याची माहितीही फडणवीसांनी दिली आहे.
गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर हि बँक देतेय सर्वात कमी व्याजदर