गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर हि बँक देतेय सर्वात कमी व्याजदर


वेगवान नेटवर्क

नवी दिल्लीः   आजकाल बरेच जण घरासाठी गृहकर्ज घेत असतात. त्यांच्याकरता महत्वाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदा  ने गृहकर्जाचे व्याजदर 0.25 टक्क्यांनी कमी करून 8.25 टक्के केले. यासोबतच प्रक्रिया शुल्कही मर्यादित कालावधीसाठी माफ करण्यात आले आहे. त्यामुळे BOB द्वारे देऊ केलेल्या गृहकर्जाचा हा दर SBI आणि HDFC पेक्षा कमी असल्याने गृहकर्ज घेणे सोपे झाले आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना आर्थिक नियोजनासाठी उत्तम दिवस

बँकेने म्हटलंय की, नवीन दर येत्या सोमवारपासून लागू होणार असून डिसेंबर अखेरपर्यंत लागू राहतील. तसेच  BOB महाव्यवस्थापक एच.टी. सोलंकी म्हणाले, “आमच्या गृहकर्जाचे दर आता उद्योगातील सर्वात कमी आणि स्पर्धात्मक आहेत. त्यामुळे  व्याजदरात 0.25 टक्के सूट देण्याबरोबरच आम्ही प्रक्रिया शुल्क देखील पूर्णपणे माफ करत आहोत.

बाजार समितीवर लिलाव सुरु होण्याच्या वेळेत झाला बदल,शेतकरी व व्यापाऱ्यांची होती मागणी

तसेच नवीन व्याजदर कर्जदाराच्या क्रेडिट प्रोफाइलवर आधारित असल्याचे बँकेने म्हटले आहे. तर तुम्हाला ८.२५ टक्के व्याजदराने मर्यादित काळासाठी कर्ज मिळत आहे. हे अनेक मोठ्या बँकांच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यात तुम्हाला कोणतीही प्रक्रिया शुल्क भरावे लागणार नसून 360 महिन्यांपर्यंतचा लवचिक कार्यकाळ उपलब्ध आहे.

त्यानंतर गृहकर्ज घेणाऱ्या नवीन ग्राहकांना SBI 25 बेस पॉइंट्स किंवा व्याजावर 0.25 टक्क्यांपर्यंत सवलत देत आहे. त्यामुळे बँकेचे गृहकर्ज ८.४० टक्के झाले आहे. ही ऑफर जानेवारी २०२३ पर्यंत आहे. त्याच वेळी, एचडीएफसीने व्याजदर 0.20 टक्क्यांनी कमी करून ते 8.40 टक्के केले आहेत.

या कंपन्यांच्या कर्मचा-यांना बसणार फटका, मोठ्या प्रमाणावर होणार कर्मचारी कपात


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *