वेगवान नाशिक
गेल्या दोन वर्षापूर्वी कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे अनेक जणांना नोकरी सोडावी लागली. त्यामुळे बहुतेक तरूणवर्ग नोकरीवाचून वंचित आहे. त्यात सध्या अनेक तरूण नोकरीच्या शोधात आहेत. अशाच तरूणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कॅनडाने आगामी तीन वर्षांत १४.५ लाख विदेशी नागरिकांना नोकरी देण्याची तयारी केली असून सरकार विदेशातील तरुणांसाठी देशाचे दरवाजे उघडणार आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना आर्थिक नियोजनासाठी उत्तम दिवस
याबाबत कॅनडाचे इमिग्रेशन मंत्री शॉन फ्रेसर यांनी माहिती दिली आहे. दरम्यान कर्मचारी टंचाईमुळे कॅनडाच्या अर्थव्यवस्थेला मोठे नुकसान होत असल्यामुळे २०२३-२५ या तीन वर्षांसाठी नवीन इमिग्रेशन योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेनुसार, १४.५ लाख विदेशी नागरिकांना कॅनडात नोकरी दिली जाणार असून नोकरी, वेतनासोबत कायमस्वरूपी नागरिकत्वही मिळणार आहे.
या कंपन्यांच्या कर्मचा-यांना बसणार फटका, मोठ्या प्रमाणावर होणार कर्मचारी कपात
तसेच कॅनडाचा जननदर प्रतिमहिला १.४ मुले इतका घसरला आहे. त्यामुळे २०३० पर्यंत कॅनडाची एकचतुर्थांश लोकसंख्या म्हणजेच ९० लाख लोक निवृत्तीच्या वयाला पोहोचतील. त्यात सध्या १४ लाख भारतीय वंशाचे नागरिक राहत असून गेल्या वर्षी १.२७ लाख लोकांना कायमस्वरुपी नागरिकत्व मिळाले होते. म्हणूनच या लोकांनी स्वयंरोजगाराचा मार्ग निवडला आहे.
गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर हि बँक देतेय सर्वात कमी व्याजदर