वेगवान नाशिक
मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सत्तातर झाल्यापासून राजकारणात प्रत्येक पक्षाची स्वःताची शाहीगिरी सुरू केली आहे. त्यात शिंदे गट आणि ठाकरेगटात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळत आहे. त्यात आता महाराष्ट्रात जेव्हा उद्धवशाही आणि पवारशाही कमी होईल तेव्हा हे एकनाथ शिंदे शिवशाही आणतील असे बोलले जात आहे. तसेच राजकारणातील पवारशाही संपलीच पाहिजे, असे खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर म्हटलंय.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना आर्थिक नियोजनासाठी उत्तम दिवस
त्यानंतर किर्तीकर यांनी माध्यमांशी संवाध साधला तेव्हा २००४ सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे यांनी माझं तिकीट कापण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप केला आहे. तसेच २००४ मध्ये उद्धव ठाकरे यांना मालाड विधानसभा मतदारसंघात माझ्याऐवजी एक उत्तर भारतीय बिल्डर व्ही.के. सिंग याचा भाऊ रमेश सिंग याला उमेदवारी देण्याच्या विचारात होते. त्यांच्यात सुरु असलेल्या गुफ्तगूची माहिती मला मिळत होती. पण त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी तसं होऊन दिलं नसून माझं तिकीट कापत असताना बाळासाहेब ठाकरे यांनी मला उमदेवारी द्यायला लावली.
या कंपन्यांच्या कर्मचा-यांना बसणार फटका, मोठ्या प्रमाणावर होणार कर्मचारी कपात
पण त्यानंतर २००९ मध्ये मला निवडणुकीचं तिकीट देण्यात आले नाही. माझा पीए सुनील प्रभूला उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलवून मी तुलाच तिकीट देणार, किर्तीकरांना देणार नाही, असे सांगायचे. एवढा मोठा पक्षप्रमुख पण अशा पद्धतीने विचार करायचा, अशी टीका गजानन किर्तीकर यांनी केली आहे.
त्यावेळी आम्ही तोंड दाबून लाथाबुक्क्यांचा मार सहन केला, अपमान पचवला, पण शिवसेना सोडली. अशावेळी उद्धव ठाकरे यांना त्यांच्या मर्जीतील माणसे आठवतात. गजानन किर्तीकर यांच्यासारखा ज्येष्ठ नेता आठवत नाही. तेव्हा उद्धव ठाकरे यांना माझं नाव लक्षात आले नाही का, असा सवालही गजानन किर्तीकर यांनी उपस्थित केला. तसेच मराष्ट्रातल्या राजकारणातील पवारशाही संपलीच पाहिजे, असे यावेळी गजानन कीर्तिकर यांनी म्हटलं आहे.
बाजार समितीवर लिलाव सुरु होण्याच्या वेळेत झाला बदल,शेतकरी व व्यापाऱ्यांची होती मागणी