वेगवान नाशिक
नाशिकः जिल्ह्यात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दोन दिवसांपूर्वी नाशिक ग्रामीण पोलिसांनी दोन मोठ्या दरोड्यांचा शोध लावला असताना अशातच आज पुन्हा जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात दरोडा घालण्याची माहिती समोर आली आहे. तर तब्बल 20 लाखांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केला आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना आर्थिक नियोजनासाठी उत्तम दिवस
मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोरी तालुक्यातील ढकांबे शिवारात पहाटेच्या सुमारास काही टोळक्यांनी पाळीव कुत्र्याला गुंगीचे औषध देऊन घरात प्रवेश केला. त्यानंतर बोडके कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देऊन घरातील दाग-दागिने, रोख रक्कमेसह २० लाखांची लूट केली. त्यामुळे ग्रामीण भागात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
बाजार समितीवर लिलाव सुरु होण्याच्या वेळेत झाला बदल,शेतकरी व व्यापाऱ्यांची होती मागणी
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच दिंडोरी पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली असून पुढील तपास सुरु केला आहे. याबाबत नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक पदी शहाजी उमाप यांनी दरोडेखोरांचा बिमोड करण्यासाठी ठोस पाऊले उचलले असून कसून तपास करत असल्याचं सांगितले.
या कंपन्यांच्या कर्मचा-यांना बसणार फटका, मोठ्या प्रमाणावर होणार कर्मचारी कपात