महाराष्ट्रातील या बॅंकेचा लायसन्स रद्द, ग्राहकांवर होणार परिणाम


वेगवान नाशिक

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील आरबीआय या बॅंकेने गेल्या चार महिन्यात दोन-तीन बँकांवर कडक कारवाई केली असून त्यात प्रसिद्ध रुपी बँकेला कायमचं टाळे लागले आहे. तसेच RBI देशभरातील बँकांच्या कारभारावर कायम लक्ष ठेवते. यामध्ये सरकारी आणि खासगी या दोन्ही प्रकाराच्या बँकांवर आरबीआयचा अंकुश असतो.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना आर्थिक नियोजनासाठी उत्तम दिवस

त्यामुळे जर बँका नियमानुसार वागल्या नाहीत तर त्यांना नोटीस देण्यात येऊनही  बँकांचे कामकाज सुधारले नाही तर अशा बँकांविरोधात कडक कारवाई करण्यात येते. तसेच RBI काही बँकांना कारभार सुधारण्याची संधी देते. त्यांच्यावर दंड लावते. मात्र तरीही बँकांचे कामकाज सुधारले नाही तर, बँकांचा परवाना रद्द करण्यात येतो. अशा बँकांमधील गुंतवणूकदारांच्या ठेवी काही प्रमाणात परत करण्यात येतात.

गुंतवणुकीस प्रोत्साहन देऊन राज्यातील बंदरे विकासाला गती देणार – मंत्री दादाजी भुसे

तसेच RBI ने महाराष्ट्रातील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेवर कडक कारवाई केली असून या बँकेचा परवाना केंद्रीय बँकेने रद्द केला आहे.
आरबीआयकडे उपलब्ध आकड्यांनुसार, या कारवाईनंतर सहकारी बँकेच्या 79 टक्के ठेवीदारांना दिलासा मिळेल. त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन कडून मिळविता येईल.

यापूर्वी अनेक बँकांच्या ठेवीदारांना DICGC कडून मदत मिळाली आहे. 16 ऑक्टोबर 2022 रोजीपर्यंत DICGC ने देशभरात एकूण विमा राशीपैकी 294.64 कोटी रुपये ठेवीदारांना नुकसान भरपाईच्या रुपात देण्यात आले आहे. तसेच रिझर्व्ह बँकेने बाबाजी दाते महिला सहकारी बँक लिमिटेडला बँकिंग व्यवसाय करण्यास प्रतिबंध घातल्यामुळे बँकेला आता ठेवीदारांकडून ठेवी जमा करता येणार नसून रक्कम ही वाटप करता येणार नाही.

ब्रेकिंग! जितेंद्र आव्हाड यांना कोर्टाने सुनावली न्यायालयीन कोठडी


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *