वेगवान नाशिक
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना काल अटक केल्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. तर त्यांना जामीन मिळणार की तुरुंगात जावं लागणार यावर न्यायालयात सुनावणी पडली असून जितेंद्र आव्हाड यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे न्यायालयाच्या बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच न्यायालय परिसरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमू नये याचीही दक्षता पोलिसांकडून घेतली जात आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना आर्थिक नियोजनासाठी उत्तम दिवस
दरम्यान, आव्हाड आता आजच उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करणार असल्याचं सूत्रांनी सांगितंल. न्यायाधीश डी.एस. पाल यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. विवियामा मॉलमध्ये हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडताना प्रेक्षकाला केलेल्या मारहाणीविरुद्ध जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. तर जितेंद्र आव्हाड यांच्यासह अकरा जणांना आज कोर्टात हजर करण्यात आलं असून आव्हाड यांच्यावर एकूण सात कलमं वर्तक नगर पोलिसांनी मारहाणीच्या आरोपाखाली लावली आहेत.
या कंपन्यांच्या कर्मचा-यांना बसणार फटका, मोठ्या प्रमाणावर होणार कर्मचारी कपात
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आव्हाडांच्या अटकेचा निषेध करण्यात आला असून आव्हाडांना करण्यात आलेली अटक ही सरकार हुकूमशाहीपणे वागत असल्याचा पुरावा आहे, अशी टीका करण्यात आली होती.
बाजार समितीवर लिलाव सुरु होण्याच्या वेळेत झाला बदल,शेतकरी व व्यापाऱ्यांची होती मागणी