वेगवान नेटवर्क
गेल्या काही वर्षांपूर्वी तामिळनाडूतील श्री पेरंबुदूर येथे आत्मघाती बॉम्बहल्ला केला होता. त्यादरम्यान माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात दोषी नलिनी श्रीहरन आणि आरपी रविचंद्रन यांना सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तर आता आज याबाबत न्यायालयाने सुणावनी दिली असून नलिनी श्रीहरन आणि आरपी रविचंद्रन यांची सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी हितशत्रूंपासून सावधान
दरम्यान याआधी राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषी एजी पेरारिवालन याची १८ मे रोजी सुटका करण्यात होती. पेरारिवालन याने राजीव गांधींच्या हत्याप्रकरणात ३० वर्षे शिक्षा भोगलेली असून त्याने संविधानातील कलम १४२ चा आधार घेत आपल्या सुटकेची मागणी केली होती. तर दोषी नलिनीने पेरारिवालनच्या बाबतीत घेण्यात आलेल्या याच निर्णयाचा दाखला देत माझीही सुटका करावी अशी मागणी केली होती.
Stock Market: शेअर बाजारात आज तेजीने सुरूवात
त्यामुळे न्यायालयाने हा निर्णय दिला असून आज दोन्ही आरोपींची सुटका करण्यात आली आहे. सुटका करण्यात आलेली दोषी महिला नलिनी सध्या पॅरोलवर कारागृहाच्या बाहेर आहे.
आधार कार्ड अपडेटसाठी सरकारी नियमांमध्ये केंद्र सरकारने केला हा बदल