वेगवान नाशिक
राज्यातील राजकारणात सध्या घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. पक्षापक्षातून सातत्याने एकमेकांवर टिका टिप्पणीचे सत्र सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यात भाजप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच लागली असून चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी हितशत्रूंपासून सावधान
ते म्हणाले, शरद पवार यांनी अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केल्याने त्यात उद्धव ठाकरे फसले आणि विचार न करता ते राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेलेत. अशी टीकाही बावनकुळे यांनी केली आहे. दरम्यान बावनकुळे हे आज पत्रकार परिषदेत बोलत होते त्यावेळी त्यांनी शरद पवारांच्या ताब्यात जर एकदा कोणी आला, तर त्याची सुटका होत नाही, असा गंभीर आरोपही केला आहे.
या बॅंकेच्या ग्राहकांना असा मेसेज येत असेल तर सावध!
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने आता सत्तेत येण्याचे स्वप्न पाहणे सोडले पाहिजे. कारण आता 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात आमचे 200 पेक्षा जास्त आमदार निवडून येतील, त्यामुळे राष्ट्रवादीने सत्तेत येण्याचा विचार आता करु नये असे बावनकुळे यांनी म्हटलंय.
त्यामुळे भाजपाकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर झालेल्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात वातावरण चांगलेच चिघळले असून चर्चेला उधाण आलं आहे.
Stock Market: शेअर बाजारात आज तेजीने सुरूवात