वेगवान नाशिक
शेअर बाजारात सारखा चढ उतार होत आहे त्यात अमेरिकन शेअर बाजार वधारल्याने त्याचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावर झालेला दिसून येत आहे. तसेच शेअर बाजारात सध्या जोरदार तेजी आल्याने बँक निफ्टीने पहिल्यांदाच 42,000 चा टप्पा गाठला. त्यामुळे बाजारातील आजच्या तेजीमध्ये सर्वच क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी हितशत्रूंपासून सावधान
अशातच मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांक सेन्सेक्सने 1024 अंकांची उसळी मारत 61,414 अंकांवर पोहोचला, तर राष्ट्रीय शेअर बाजारात 244 अंकांची वाढ होऊन 18,272 अंकांवर पोहोचला. त्यामुळे सेन्सेक्स पुन्हा 61 हजाराच्या अंकांवर तर निफ्टी 287ने अंकांनी वाढला आहे.
तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर,जाणून घ्या
यामध्ये आयटी, एफएमसीजी, एनर्जी, ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठया प्रमाणात तेजी आहे. मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्सही तेजीत आहेत. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी फक्त एक शेअर लाल चिन्हात तर 49 शेअर्स हिरव्या चिन्हात व्यवहार करत आहेत. त्याचबरोबर सेन्सेक्सच्या 30 समभागांपैकी 29 समभाग वाढीसह व्यवहार करत असून एक समभाग घसरत आहे.
तसेच चलनवाढीचा दर घसरल्यानंतर अमेरिकन शेअर बाजारात मोठया प्रमाणात वाढ झाली. त्यात नॅसडॅक 7.35 टक्के म्हणजेच 760 अंकांनी वाढून 11,114 अंकांवर बंद झाला तर डाऊ जोन्स 1200 अंकांनी वधारला.
राज्यात २५ हजार उद्योजक घडविण्याचे शासनाचे उद्दिष्ट- उद्योगमंत्री उदय सामंत