वेगवान नाशिक
सिन्नरः येथील शिर्डीला जाणा-या सायकल स्वारांचा कारला धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू तर तीनजण जखमी झाले आहेत.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी हितशत्रूंपासून सावधान
याबाबत माहिती अशी, सिन्नर येथील लोंढे गल्लीतील पाच मित्र सायकल वरून शिर्डीस जात होते त्यावेळी मुंबई विरारहून शिर्डीकडे जाणाऱ्या महिंद्रा कारने (एमएच ४८ एके ६२८६) मागील सायकल स्वारांना जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन सायकल स्वार जखमी झालेत. त्यात आदित्य महेंद्र मिठे व कृष्णा संतोष गोळेसर असे मृत व्यक्तींची नावे आहेत.
राज्यात २५ हजार उद्योजक घडविण्याचे शासनाचे उद्दिष्ट- उद्योगमंत्री उदय सामंत
दरम्यान ही घटना शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली असून, या ठिकाणी असलेल्या तरुणांनी घटनास्थळाकडे धाव घेत परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पांगरी येथील रुग्णवाहिकेला तात्काळ बोलावून मृतांसह जखमींना सिन्नर येथे पाठवण्यात आले आहे. तर जखमींपैकी कारमधील प्रवासी मुंबईचे असल्याने त्यांना उपचार घेण्यासाठी मुंबईला पाठवण्यात आले आहे.
त्याच्यांवर सध्या उपचार सुरू असून परिस्थिती स्थिर असल्याचं सांगितल जात आहे.
तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर,जाणून घ्या