वेगवान नाशिक
नाशिक : सध्या नाशिकमध्ये दोन शेतक-यांनी वीज वितरण कंपनीला चांगलाच धडा शिकवला असून शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याची भावना निर्माण झाल्याने जोरदार चर्चा होऊ लागली आहे. दरम्यान सिन्नर तालुक्यातील मधुकर ठोंबरे आणि विलास देवळे या दोन शेतक-यांनी वेळेत वीज जोडणी न केल्याने ग्राहक न्याय मंचाकडे धाव घेतली होती.
त्यामुळे आता वीज वितरण कंपनीला ग्राहक न्याय मंचाने नऊ लाख रुपयांचे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी असा आदेश काढला आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीला चांगलाच झटका दिला आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी हितशत्रूंपासून सावधान
दरम्यान, सिन्नर तालुक्यातील या दोन्ही शेतकऱ्यांची ऐन पावसाळ्यात वीज खंडित झाली होती. पण त्यावेळी ही खंडित झालेली वीज जोडणी वेळेत न केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते त्यामुळे या शेतक-यांनी ग्राहक मंचात तक्रार दाखल केली होती. तर त्यानुसार नुकतीच यावर सुनावणी झाली असून ग्राहक न्यायालयाने दोन्हीही पक्षकारांचे युक्तिवाद ऐकून घेत निर्णय दिला आहे.
या बॅंकेच्या ग्राहकांना असा मेसेज येत असेल तर सावध!
या निर्णयामध्ये वीज वितरण कंपनीला एकूण 9 लाख रुपये देण्याचे आदेश दिले असून त्यात पिकाच्या नुकसानीपोटी 1 लाख आणि घरगुती आणि कृषिपंप या दोन्हीची 2016 ते 2017 या काळात वीजजोडणी न दिल्याने प्रतिदिन बाराशे रुपये प्रमाणे 7 लाख 92 हजार रुपये द्यावे लागणार आहे. तसेच हे दोन्ही शेतकरी नियमित वीज बिल भरणारे असून, शेतीकामासाठी कृषीपंप आणि घरगुती वीजजोडणी आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीला या शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांना कौशल्य आणि तंत्रज्ञान आधारित शिक्षण देण्यात येणार- दीपक केसरकर