वेगवान नाशिक
मुंबईः शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना कालच कोर्टाकडून जामीन झाला असून तब्बल १०० दिवसानंतर सुटकेचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.तसेच ईडीने कोर्टाविरोधात केलेलं अपील देखील न्यायालयाने फेटाळून लावले आहे त्यामुळे संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून जल्लोष केला जात आहे.
Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळणार
याबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक ट्वीट करुन प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, वाघ बाहेर येत असल्याचा एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओला सत्यमेव जयते! असं कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे राऊत यांच्या रुपाने वाघ पुन्हा एकदा पिंजऱ्याबाहेर आला असल्याचं पवार यांनी सुचित केलं आहे.
राज्यातील ७७५१ ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
दरम्यान आमदार रोहित पवार यांनी 12 सेकंदाचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्या व्हिडिओत एक भला मोठा पिंजरा दिसत आहे. हा पिंजरा उघडतो. त्यातून शांतपणे बसलेला वाघ मोठ्या रुबाबात झेप घेतो आणि दमदार पावलं टाकत जंगलाकडे झेप घेतो. असं यामध्ये दिसतं आहे.
Share Market:भारतीय शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी 134 अंकांच्या खाली