वेगवान नाशिक
नाशिकः काही दिवसांपूर्वी सिडको प्रशासन कार्यालय औरंगाबाद येथे हलविण्याचे आदेश दिले होते. मात्र काही नागरिकांचे घरे न मिळाल्याने ते मिळेपर्यंत हे कार्यालय नाशिकमध्येच राहणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता राज्य शासनाने सिडको कार्यालय नाशिकमध्येच सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळणार
याआधी कार्यालय बंद करण्याच्या निर्णयाच्या विरोधात राजकीय पक्ष व नागरिकांनी आंदोलने निर्माण केली होती. म्हणूनच ही बाब लक्षात घेता सिडकोच्या नवी मुंबई येथील व्यवस्थापकीय संचालक यांना पत्र पाठवून आवश्यक कर्मचारी ठेवून कार्यालय सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
मोठी बातमी ! अजित पवार नॉट रिचेबल
तसेच सिडको बंदच्या आदेशामुळे नागरिकांना ना हरकत दाखला, मिळकत हस्तांतरण, यासारखी महत्वाची आणि लहान-मोठी कामे करण्यासाठी सामान्य औरंगाबाद येथे फेऱ्या माराव्या लागणार होत्या. याला अने पक्ष संघटनाकडून विरोध करण्यात येत होता.
त्याशिवाय नागरिकांची घरे फ्री होल्ड करून द्यावी, त्यानंतरच कार्यालय बंदच निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सिडको प्रशासनाचा विरोधात जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता. त्यामुळेच अखेर राज्य शासनाने कार्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील ७७५१ ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर