वेगवान नाशिक
नाशिक : शहरात सध्या खून, हाणामारी,आत्महत्या सारखे प्रकार सातत्याने घडताना दिसत आहे. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली असून जेलरोड परिसरात एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सागर अशोक आहिरे (३२) असे या तरुणाचे नाव आहे.
Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळणार
मिळालेल्या माहितीनुसार, सागर आहिरे याचा चार दिवसांनी विवाह असून 13 तारखेला होणार होता. त्यामुळे त्याच्या घरात लग्नाची तयारी जोरात सुरू असून अंतिम टप्प्यात आली होती. मात्र, अचानक सागर हा सोमवारी बेपत्ता झाला. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी शोध सुरू केला असता दुस-या दिवशी एकलहरे रोडवरील गवळी बाबा मंदिर परिसरात सागरचा मृतदेह आढळून आल्याने कुटुंबाला आणि नातलगांना मोठा धक्का बसला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
ब्रेकिंग! मुंबईवर पुन्हा दहशतवादी हल्लाचं सावट, अलर्ट जारी
दरम्यान या घटनेमागे नेमकं कारण काय ? सागरची हत्या कुणी केली ? सागरच्या मृत्यूचं कारण काय ? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. या मृत्यूमागे घातपात तर नाही ना असा संशय कुटुंबियांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सागरच्या मृत्युचे कारण शोधणे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.
तसेच सागरचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्यासह पोलीस पथक अधिक तपास करीत आहे.
राज्यातील ७७५१ ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर