वेगवान नाशिक
नाशिकः गंगापूर रोड परिसरात बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळणार
मिळालेल्या माहितीवरून फिर्यादी संजय दिप मर्माट जाधव राहणार पारोळा. जळगाव यांचा भाऊ हरि जाधव व त्याची मैत्रीण दिपिका शिंदे हे दोघे जे.जे क्रमांक २६३ ०४८३ या दुचाकीने सातपूरहून सीबीएसकडे जात होते. त्यावेळी पंचवटी ई लाईट हॅाटेल जवळ सिविल हॅास्पिटलकडून आलेल्या एक खाजगी बस सिग्नल जवळ वळण घेत असताना दुचाकीला धडकली.
त्यात दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक बेचकेकर करीत आहे.
Share Market:भारतीय शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी 134 अंकांच्या खाली