शहर काँग्रेसच्या वतीने नागरी समस्या सोडवण्यासाठी बेमुदत उपोषण


वेगवान नाशिक/Nashik/अविनाश पारखे,

मनमाड, नांदगाव-

शहर ब्लॉक काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी नगरसेवक नाजीम शेख यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषणाला सुरूवात करण्यात आली.यावेळी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अफजल शेख,भीमराव जेजुरे,मुमताज बेग, संजय निकम,फरीदा मिठाईवाला आदी उपस्थित होते.

शहराला कायमस्वरूपी 8 दिवसाआड सुरळीत पाणीपुरवठा करावा,सर्वासाठी घरे 2022 योजनेची शहरात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी शासकीय मोजणी करावी,शहरातील रस्त्यांची,पुलांची तात्काळ दुरुस्ती करावी,तुंबलेल्या गटारी,चेंबरची नियमित साफसफाई करावी,उघडयावर असणाऱ्या घाणीची विल्हेवाट लावावी,शहरातील सर्व सार्वजनिक मुतारी दुरुस्ती कराव्यात,प्रत्येक वार्डामध्ये औषध फवारणी करावी,बंद पडलेले पथदीप तात्काळ दुरुस्त करावेत,मौलाना आझाद हॉलची तात्काळ दुरुस्ती करून जनतेसाठी खुले करावे,पालिकेचे बंद पडलेले गाळे फेरलिलाव करून सुशिक्षित तरुणांना रोजगारासाठी उपलब्ध करून द्यावेत,शहरातील बेशिस्त वाहन पार्किंगला आळा घालावा,आययूडीपी येथे नव्याने तयार होत असलेल्या व्यापारी संकुलात स्थानिक तरुणांना प्राधान्य देण्यात द्यावे,दिव्यांग, महिलासाठी गाळे आरक्षित करावेत,महर्षी वाल्मिकी स्टेडियमची दुरुस्ती करून जॉगिंग ट्रॅक बनवावे,अपूर्ण अवस्थेत असलेले सावित्रीबाई फुले भाजी मार्केट चालू करावे आदी मागण्यांसाठी हे उपोषण केले जात आहे. सर्व मागण्यांचे  निवेदन मुख्याधिकारी डॉ सचिनकुमार पटेल यांना देण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद,शहरप्रमुख माधव शेलार,समाजसेवक विलास कटारे,सुनील पाटील, संतोष जगताप,रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आहिरे, कार्याध्यक्ष गंगादादा त्रिभुवन,सेवादल जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव,फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंचचे कार्याध्यक्ष फिरोज शेख आदी उपस्थित होते.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *