वेगवान नाशिक
मुंबई : राज्यात सध्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारित दिव्यांग कल्याण आयुक्तालय कार्यरत असून त्यामाध्यमातून दिव्यांगांसाठीच्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात येते, सध्या दिव्यांगांच्या कार्यक्रम खर्चासाठी ११३० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पित केली आहे. लवकरच राज्यात स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग निर्माण करण्यात येणार असून त्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते.
Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळणार
याबाबत कालच मंत्रालयामध्ये बैठक संपन्न झाली. याच बैठकीमध्ये राज्यात दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे. आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं असून देशात पहिल्यांदाच राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं.
Share Market:भारतीय शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी 134 अंकांच्या खाली