या बँकेबाबत केंद्र सरकारने घेतला हा निर्णय


वेगवान नेटवर्क

नवी दिल्ली : बाजारात आज आपल्याला अनेक शेअरवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्याचे गुंतवणूकदारांवर परिणाम होत आहे. असाच एक मोठा निर्णय केंद्र सरकारने खासगी क्षेत्रातील बँकेबाबत घेतला आहे. भारतातील तिसरी सर्वात मोठी खासगी बँक असलेली अॅक्सिस बँक या बँकेतून  केंद्र सरकारने त्यांची 1.55 टक्क्यांचा हिस्सा म्हणजे 4.65 कोटींचे शेअर विक्री करणार आहे. त्यामुळे  त्याचा परिणाम आज बाजारात या शेअरवर  दिसून आला असून हा शेअर बाजारात 3 टक्के घसरला आहे.

Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळणार

याबाबतच्या निर्णयाची शेअर बाजार आणि नियामक आयोग सेबीला माहिती देण्यात आली आहे. केंद्र सरकारची एजन्सी, स्पेसिफाईड अंडरटेकिंग ऑफ द यूनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची (SUUTI) या बँकेत 1.55 टक्के हिस्सेदारी होती. म्हणूनच केंद्र सरकार अॅक्सिस बँकेतून संपूर्णपणे बाहेर पडत असून बँकेतील संपूर्ण हिस्सेदारी केंद्र सरकार काढून घेणार आहे.

दरम्यान सरकारकडे या बँकेची 5 सप्टेंबर 2022 पर्यंत 1.55 टक्के हिस्सेदारी होती. त्यामुळे त्यात सरकारकडील 4,65,34,903 शेअरची विक्री करुन 4,000 कोटी रुपये जमा होण्याचा अंदाज आहे. तसेच यापूर्वी गेल्या वर्षीही सरकारने बँकेतील 1.95 टक्के हिस्सा विक्री केला होता. त्यातून 4,000 कोटी रुपये जमविले होते.

ब्रेकिंग! मुंबईवर पुन्हा दहशतवादी हल्लाचं सावट, अलर्ट जारी

या निर्णयानंतर गुरुवारी अॅक्सिसचा शेअर घसरुन 845.15 रुपयांवर बंद झाला. तर NSE वर हा शेअर 3.23 टक्के घसरला. तर या बँकेने गेल्या महिन्यांत गुंतवणूकदारांना 10 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. तसेच  2022 या वर्षात अॅक्सिस बँकेच्या शेअरमध्ये 20 टक्क्यांची वृद्धी दिसून आली. त्यामाध्यमातून सरकार मोठा निधी उभारणार आहे.

Share Market:भारतीय शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी 134 अंकांच्या खाली

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *