ब्रेकिंग! मुंबईवर पुन्हा दहशतवादी हल्लाचं सावट, अलर्ट जारी


वेगवान नाशिक

मुंबई : महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईवर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला होणार असल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे या दहशतवादी हल्ल्याबाबत अलर्ट जारी करण्यात आला असून, त्यानुसार दहशतवादी ड्रोन आणि छोट्या विमानांच्या सहाय्याने मुंबईत दहशतवादी हल्ला करणार असल्याची शक्यता दिली जात आहे.

Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळणार

तर सध्या मुंबईत ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली असून सावध राहण्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे शहरवासीया मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोठी बातमी ! अजित पवार नॉट रिचेबल

सूत्रांनी सांगितल्यानुसार, मुंबईत रिमोट कंट्रोल विमानातून हल्ल्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे दहशतवादी आतंकी व्हीव्हीआयपींनाही लक्ष्य करू शकतात, असे बोलले जात आहे.

याआधी ४ नोव्हेंबरला मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला हाजी अली दर्ग्यावर दहशतवादी हल्ल्याचा धोका होता. धमकी मिळाल्यानंतर मुंबईतील तारदेव पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलीस आणि बॉम्ब शोधक व निकामी पथकाच्या व्हॅनच्या माध्यमातून संपूर्ण परिसराची झडती घेण्यात आली, मात्र काहीही सापडले नाही. म्हणूनच सावधानतेचा इशारा दिला असून अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यातील ७७५१ ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *