लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याबाबत केंद्रीय निवडणूकआयोगाचं मोठं विधान


वेगवान नाशिक 

राज्यात सध्या येणा-या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांबाबत चर्चेला उधाण आलं आहे. त्यात नुकतच केंद्रीय  निवडणूक आयोगानं  लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याबाबत  मोठं विधान केले असून आयुक्त राजीव कुमार यांनी वन नेशन, वन इलेक्शन यासाठी निवडणूक आयोग तयार असून अंतिम निर्णय सरकारने घ्यावा असं म्हटल आहे.

Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळणार

त्यामुळे आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित होण्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच याबाबत निर्णय घेण्याचा आयोगाकडे नसून  त्यावर अंतिम निर्णय सरकारने घ्यावा. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग तयार असून राजीव कुमार यांनी सरकारकडे निर्णय सोपवला असल्याचं सांगितल.

या बँकेबाबत केंद्र सरकारने घेतला हा निर्णय

त्यानंतर  यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की, देशात ३६५ दिवस म्हणजे १ वर्ष कुठे ना कुठे निवडणुका असतात. त्यामुळे वन नेशन, वन इलेक्शन व्हाव्यात. त्यामुळे खर्चही वाचेल असं त्यांनी सांगितले. त्याचबरोबर राजकीय पक्षांना सोयीचं राजकारण करण्याऐवजी एक भूमिका घेऊन लोकांसमोर जावं लागेल असं सांगत देवेंद्र फडणवीसांनी लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचे संकेत दिले आहेत.

दरम्यान महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील अंतर हे ६ महिन्यापेक्षा कमी आहे. त्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर अडीच वर्षांनी भाजपा-शिंदे गटाने सरकार आलं. त्यात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. त्यामुळे २०२४ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित होणार अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

संजय राऊतांच्या जामीनावर रोहित पवारांचं ट्विट, म्हणाले..

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *