वेगवान नाशिक
मुंबईः मागील काही दिवसांपासून शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळा प्रकरणी तुरुंगात आहेत. त्यांच्यावर ईडीने छापा टाकून मालमत्ता जप्त करून कारवाई केली. त्यानंतर या प्रकरणी न्यायलायान कोठडी सुनावण्यात आली.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी कोणाच्या मध्ये पडू नये Todays Horoscope Marathi
तसेच याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून राऊतांकडून जामिनासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अद्याप पीएमएलए कोर्टाने त्यांना दिलासा दिलेला नसल्यामुळे आज होणा-या सुनावणीत काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
aliens एलियन्सनी संपर्क साधला तर काय होईल
दरम्यान संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील मागील सुनावणी २ नोव्हेंबर रोजी पार पडली होती. यावेळी राऊतांच्या जामिनासंदर्भात ईडीनं आपलं लेखी उत्तर न्यायालयात सादर केलं. त्यानंतर न्यायालयानं जामीनावरील आपला निकाल राखून ठेवला होता. तर आज यावर सुनावणी होणार असून न्यायालय निकाल देणार आहे.
त्यामुळे आज न्यायालयात काय घडणार, जामीन अर्जावर काय निकाल देण्यात येणार हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.
सत्तारांचे कपडे फाडणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस, राष्ट्रवादीच्या महिला नेत्याची घोषणा