नाशिकः धक्कादायक! 26 वर्षीय तरूणाचा संशयास्पदरित्या आढळला मृतदेह


वेगवान नाशिक

नाशिक : जिल्ह्यात गुन्हे थांबायचं काही नाव घेईना. एकामागे एक गुन्ह्याचं सत्र सुरूच आहे. असाच एक प्रकार जिल्ह्यातील देवळाली कॅम्प-भगूर रस्त्यावर एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं असून एका २६ वर्षीय तरुणाचा बेशुद्ध अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. गणेश पंजाब पठाडे असं या मृत तरूणाचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात  गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी कोणाच्या मध्ये पडू नये Todays Horoscope Marathi

मिळलेल्या माहितीनुसार, मृत गणेश हा मूळचा हिंगोलीचा असून तो आपली  बहिण प्रज्ञा कांबळे हिला  सासरी सोडायला नाशिकला आला होता. परंतु बहिणीला सासरी सोडून तो पुन्हा माघारी परतलाच नाही. नेमकं त्याच्याबरोबर असं काय घडलं हे शोधून काढण्यास पोलिसांसमोर आव्हान उभं राहील आहे. यामुळे  नाशिक जिल्हा हादरून गेल आहे.

दरम्यान या झालेल्या प्रकारात तपासात या तरूणाला अमानुष मारहाण करून खून केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच गणेश हा सकाळी बहिणीच्या घरून नाश्ता करुन झाल्यावर त्याला मोबाईलवर एक फोन आला. त्यानंतर तो  फोनवर बोलत बोलत तो घराबाहेर पडला तसा परत घरी जिवंत परतलाच नाही. त्यानंतर बहीण प्रज्ञा हीने गणेशला मोबाईलवर संपर्क करण्याचाही प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ न शकल्याने त्याचा तपास केला असता तो संध्याकाळी देवळाली कॅम्प-भगूर रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत आढळून आला.

सत्तारांचे कपडे फाडणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस, राष्ट्रवादीच्या महिला नेत्याची घोषणा

त्यानंतर त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, या तरूणाला मारहाण कुणी केली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नसून संशयित मारेकऱ्यांना अटक करण्याचं आणि गणेशच्या हत्येचा छडा लावण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकल असून याबाबत पुढील तपास पोलिस करीत आहेत.

aliens एलियन्सनी संपर्क साधला तर काय होईल

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *