वेगवान नाशिक
नाशिक : राज्यातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी गेल्या तीन वर्षापासून अनुदानाची रक्कम मिळाली नसल्याने शाळांच्या संस्थाचालकांनी दिवाळीनंतर निवासी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून नामांकित शाळांचे प्रलंबित शुल्क मिळण्यासाठी नाशिकमध्ये धरणे आंदोलन सुरु केली आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी कोणाच्या मध्ये पडू नये Todays Horoscope Marathi
त्याचप्रमाणे थकीत अनुदानाच्या मागणीसाठी मंत्रालयातही पाठुरावा केला, मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यामुळे अखेर त्यांनी आदिवासी विकास विभागाविरोधातील रोष वक्त करण्यासाठी आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. तसेच अनंत कान्हेरे मैदानाच्या परिसरात एक दिवसीय धरणे आंदोलन सुरू केल्यामुळे नामांकित योजनेंतर्गत अनुदान थकीत असलेल्या राज्यभरातील १४८ शाळांचा प्रश्न पेटला आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यात १० नामांकित निवासी इंग्रजी शाळांचा समावेश आहे.
aliens एलियन्सनी संपर्क साधला तर काय होईल
गेल्या तीन वर्षांपासून अनुदानाचा संपूर्ण निधी न मिळाल्याने संस्थांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे यासंदर्भात संस्थाचालकांची नाशिकमध्ये बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. मात्र, संस्थाचालकांना न्याय मिळाला नसून, पदरी निराशा पडल्याने संस्थाचालक संघटनेने आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
तसेच तीन वर्षाचे शुल्क थकीत असल्याने इतर शैक्षणिक व भौतिक सुविधा पुरवतो. त्यामुळे दिवाळीनंतर द्वितीय सत्रात या सर्व सुविधा देण्यास शाळा आर्थिक दृष्ट्या असमर्थ आहेत, अशी खंत आंदोलनाला आलेल्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
रोजगार मेळाव्यांच्या आयोजनासाठी आता भरीव आर्थिक तरतूदीला मान्यता