वेगवान नाशिक
राज्यात सध्या थंडीचा जोर वाढला असून पहाटेच्या वेळी थंडी तर दुपारी उन्हाचा चटका पाहायला मिळत आहे. त्यात उत्तर भारतातून कोरडे वारे वाहत असल्यानं थंडी वाढली आहे. त्यामुळे हवामान विभागाने थंडी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच श्रीलंकेच्या किनारपट्टीजवळ नैऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्यामुळे देशातील काही भागात पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी कोणाच्या मध्ये पडू नये Todays Horoscope Marathi
दरम्यान दिल्लीसह उत्तर प्रदेश तसेच अनेक राज्यात थंडीचा जोर वाढल्याने अनेक राज्यांमध्ये गुलाबी थंडी सुरू झाली आहे. तर बर्फवृष्टीमुळे डोंगराळ भागात थंडी वाढली असून येत्या काही दिवसांत कमाल तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, दिल्लीसह हरियाणाच्या फरिदाबाद आणि गुरुग्राममध्ये आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर फरिदाबादमध्ये विजांच्या गडगडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
सत्तारांचे कपडे फाडणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस, राष्ट्रवादीच्या महिला नेत्याची घोषणा
तसेच हवामान खात्याने आज डोंगराळ राज्यांमध्ये बर्फवृष्टी सुरु राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे उत्तराखंडमध्ये हलका पाऊस पडू शकतो. तर राज्यात पहाटे दव धुकेही पडत असल्याने काही ठिकाणी ढगाळ वातावरण असले तरी दुपारी कडक उन्हाचा चटका बसत आहे. राज्यात किमान तापमान 12 ते 21 अंशाच्या आसपास आहे.
aliens एलियन्सनी संपर्क साधला तर काय होईल