वेगवान नाशिक
चांदवड : नाशिक जिल्ह्यात सध्या चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. त्यात काही दिवसांपासून सातत्याने काही ना काही चोरी झाल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. अशातच जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात मुंबई-आग्रा महामार्गांवर कंटेनरमध्ये चोरी झाल्याची घटना घडली असून तब्बल ९ लाखांची चहापत्ती लंपास केली आहे. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी कोणाच्या मध्ये पडू नये Todays Horoscope Marathi
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदवड येथे ट्रक चालक नेहमी प्रमाणे एका ढाब्यावर जेवण करण्यासाठी थांबला असता चोरट्यांनी संधी साधून कंटेनरचे कुलूप तोडले.व चहा पत्तीचे 142 बॉक्स चोरून पसार झाले. तर या 142 चहापत्तीच्या बॉक्सची किंमत ही तब्बल 9 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
रोजगार मेळाव्यांच्या आयोजनासाठी आता भरीव आर्थिक तरतूदीला मान्यता
त्यानंतर चालक जेव्हा कंटेनरकडे परत आला तेव्हा त्याला कंटेनर उघडलेले असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्याने लगेच पोलिसांना याबाबत माहिती दिली असता या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
तसेच तपासादरम्यान या कंटेनरमध्ये महाग चहाची पत्ती होती, हे आधीच चोरट्यांना माहिती असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला जात आहे.
सत्तारांचे कपडे फाडणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस, राष्ट्रवादीच्या महिला नेत्याची घोषणा