वेगवान नाशिक
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत तुरुंगात होते. या जामीनावर कोर्टात सुनावणी सुरू असून गेल्या सुनावणीवेळी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने राऊतांच्या जामीन अर्जावरी आपला निर्णय राखून ठेवला होता. मात्र यावर आज अखेर कोर्टाने सुनावणी केली असून जामीन मंजूर झाला आहे. यामुळे संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी कोणाच्या मध्ये पडू नये Todays Horoscope Marathi
तर पीएमएल न्यायालयाकडून संजय राऊत यांना 100 दिवसांनंतर जामीन मंजूर करण्यात आला आहे. पण पीएमएलए कोर्टाने संजय राऊत यांना जामीन मंजूर केला असला तरी काही अटीही घालून दिल्या आहेत. त्यात दोन लाख रुपयांची वैयक्तिक हमी व तितक्याच रकमेचा हमीदार देण्याच्या अटीवर विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी संजय राऊत यांना जामीन मंजूर केला.
सत्तारांचे कपडे फाडणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस, राष्ट्रवादीच्या महिला नेत्याची घोषणा
दरम्यान पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना 31 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून संजय राऊत हे तुरुंगात होते. त्यानंतर राऊत यांना पहिले ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. आणि मग त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून ते आर्थर रोड कारागृहामध्ये होते.
याप्रकरणी ईडीने अधिक तपास करत पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप केला होता. मात्र राऊतांचा या घोटाळ्याशी काहीच संबंध नाही असा युक्तीवाद राऊतांचे वकील करत आहेत. मात्र ईडीकडून राऊत हेच घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे.
राज्यात विविध भागात थंडीचा जोर, तर या भागात पावसाची शक्यता