वेगवान नाशिक
राज्यात सध्या अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यामुळे याचे प्रतिसाद राज्यभर उमटताना दिसत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला असून अब्दुल सत्तार यांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. तसे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले आहे.
AstroSage आजचे राशी भविष्यः या लोकांनी पैसा नाही वाचविल्यास पुढे खुप अडचणी येणार
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला असून त्यांनी राज्याच्या मंत्रीमंडळात असणाऱ्या एका जबाबदार मंत्र्याने अशी भाषा वापरणे तसेच भारताच्या संसदेच्या सदस्य असेलल्या महिलेचा अशा प्रकारे अपमान करणे, याचा निषेध आज संपूर्ण महाराष्ट्रभर करण्यात येत आहे. त्यामुळे अशा मंत्र्याला मंत्रीमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी करणारे निवदेन आम्ही राज्यपालांना दिले असल्याची प्रतिक्रिया जयंत पाटीलांनी दिली आहे.
संभाजी भिडे गुरुजींच्या अडचणीत वाढ!
तसेच यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना चहाऐवजी दारु पिता का? असा प्रश्न त्यांनी विचारला होता. तर मंत्रीमंडळातील सदस्यांनी काही मर्यादा सांभाळाव्या लागतात. मात्र, त्याचे वारंवार उल्लंघन करण्यात येत असल्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी आम्ही राज्यापालांकडे केली असल्याचेही ते म्हणाले आहे. त्यामुळे याबाबतीत आताा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी ताबडतोब निर्णय घेतला पाहिजे.
त्यानंतर जयंत पाटील म्हणाले की, आपण कितीही एकमेकांचे विरोधक असलो, तरीही भाषेची मर्यादा नेहमीच सर्वांनी सांभाळली आहे. त्यामुळे आपण कोणाचा अरे-तुरे असा एकेरी उल्लेखही करत नाही, अशा परंपरेला छेद देण्याचे काम सत्तार यांनी केले आहे, अशी टीकाही पाटलांनी केली आहे. तसेच अब्दुल सत्तार हे मंत्री आहेत म्हणून पोलीस घाबरत असतील तर पोलिसांनी आपल्या कर्तव्यापासून चुकू नये, कारण सरकारे येतात आणि सरकारे जात असतात, असे आवाहनही जयंत पाटील यांनी केलय.
मी जर उपमुख्यमंत्री असतो तर बाहेर पडलो असतो