वेगवान नाशिक/Nashik/अविनाश पारखे, मनमाड,नांदगाव – मनमाड शहरासाठी आवश्यक असलेली आणि ज्याच्याभोवती नांदगाव तालुका तसेच मनमाड शहराचे राजकारण आतापर्यंत फिरत आले आहे अशा पाणी प्रश्नी नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी जाहीर केलेली योजना आता लवकरच प्रत्यक्षात येणार आहे.त्यासाठी कार्यकारी अभियंता,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग नाशिक यांनी जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे 78 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना,ता.नांदगाव,मालेगाव, देवळा जि.नाशिक या योजनेची अंदाजित किंमत 234 कोटी 35 लाख 50 हजार 835 ची ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड, उल्हासनगर यांना कार्यारंभ आदेश जारी करण्यात येणार आहे.या उद्घाटनासाठी स्वतः मुख्यमंत्री उपस्थित राहतील अशी माहिती ही यावेळी दिली.
येत्या 18 ते 19 महिन्यात करंजवण योजना पूर्ण होईल आणि मनमाड शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल अशी माहिती आपल्या संपर्क कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत दिली.यावेळी त्यांनी पाटोदा पाणीपुरवठा योजना ही एमआयडीसी कडे वर्ग करण्यात येणार असून लवकरच एमआयडीसीसाठी जागा अधिग्रहण सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही दिली.
मनमाड शहरातील भूमिगत गटारींसाठी 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. शहरात मागील काळामध्ये दलित वस्ती योजना,गटारी किंवा जी काही कामे झाली या सर्व कामाची अधिकृत चौकशी सुरू झाली असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.
यावेळी आमदार कांदे यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रमुख (ग्रा),उपजिल्हा प्रमुख,तालुका प्रमुख,शहरप्रमुख, तालुका संघटक,तालुका समन्वयक, जिल्हा युवा अधिकारी, उपजिल्हा युवक अधिकारी,तालुका युवा अधिकारी,युवा सेना शहर प्रमुख,युवा सेना तालुका समन्वयक,शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुका समन्वयक,शिवसेना अपंग सेना शहराध्यक्ष,प्रसिद्धी प्रमुख यांची नियुक्ती देखील करण्यात आली.
⁹
