वेगवान नाशिक
राज्यातील राजकारणात नेमकं काय चाललंय, याचा काही नेम लावला जात नाहीय. कारण सध्या राज्यात मज्जाक म्हणून राजकारण सुरू आहे की काय असा प्रश्न जनतेला पडला आहे. आपण पाहिले तर सध्या सारखे या ना त्या पक्षातील नेत्यांचे एकमेकांवर टीका टीप्पणीचे सत्र सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
AstroSage आजचे राशी भविष्यः या लोकांनी पैसा नाही वाचविल्यास पुढे खुप अडचणी येणार
त्यात गेल्या काही दिवसांपूर्वी संभाजी भिंडे यांनी महिला पत्रकाराला टिकली वरून वादग्रस्त विधान केलं होत. तर अब्दुल सत्तारांनी सुप्रिया सुळे यांच्यावर बोलताना शिवीगाळ केली होती.
त्यानंतर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषद घेतली असून त्यांनी भिडे आणि सत्तार यांच्यावर टीका केली असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस एक शब्द देखील काढत नाही, असल्याचं म्हणत टोला लगावला आहे. त्यात त्यांनी थेट देवेंद्र फडणवीसांना राजीनामाच मागितला.
शिवसेना नेते अनिल परब यांची अडचण वाढणार?
त्या म्हणाल्या, देवेंद्रजी तुम्हाला काम झेपत नसेल तर सरळ राजीनामा द्या” तर त्यांनी महिला आयोगाल विनंती केली की गुलाब पाटील, अब्दुल सत्तार यांच्या विरोधात नोटीसा काढा त्यांच्यावर कारवाही करा. तसेच देवेंद्रजी तुम्ही अमृता फडणवीस यांना टिकली वरुन बोलता का.असं अंधारे यांनी म्हटलं आहे. तसेच त्यावर देवेंद्रजी तुम्ही काय बोलणार आहे का, असा देखील सवाल त्यांनी केला आहे.