वेगवान नाशिक
भारतीय दंड संहिता कलम 420 अन्वये दापोली पोलिसांनी या गुन्ह्याचीं नोंद केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबत ट्वीट केले आहे. दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी(Dapoli Sai Resort) शिवसेना नेते आमदार अॅड. अनिल परब (Anil Parab) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमय्यांनी या रिसॉर्टचे पाडकाम करण्यासाठी प्रशासनाकडे तगादा लावला होता. या रिसॉर्टचे पाडकाम जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात येणार आहे. त्याआधीच अनिल परब यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास हा गुन्हा दाखल करण्यात आला.
दापोली येथील साई रिसॉर्ट हे अनिल परब यांच्या मालकीचे असून परब यांनी पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून बांधकाम केले असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. त्याशिवाय, हे रिसॉर्ट खरेदी करण्यासाठी गैरमार्गाने कमावलेला पैसा वापरला असल्याचा आरोप त्यांनी केला होता.