संभाजीराजे यांच्या जीवितास धोका, नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने सरकारकडे केली हि मागणी


वेगवान नाशिक

चित्रपटसृष्टीत गेल्या दोन दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातील इतिहासावर आधारित प्रदर्शित झालेल्या आणि प्रदर्शित होऊ पाहणाऱ्या चित्रपटाविषयी राज्यात तीव्र असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. त्यातली त्यात संभाजीराजे छत्रपती यांनी मराठीतील दोन चित्रपटांविरुद्ध आपली भूमिका स्पष्ट केल्याने राज्यभरात तणावाचे वातावरण दिसत आहे.

AstroSage आजचे राशी भविष्यः या लोकांनी पैसा नाही वाचविल्यास पुढे खुप अडचणी येणार

यामुळे अनेक ठिकाणच्या चित्रपटगृहात वादही पाहायला मिळाले. या प्रकरणी संभाजी राजे छत्रपती यांना झेड प्लस सुरक्षा  देण्याची मागणी करण्यात आली असून नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहीत सुरक्षा वाढवून देण्याची मागणी केली आहे.

या पत्रात म्हटले आहे कि,चित्रपट सृष्टीवर माफीया अंडरवर्ल्ड मधील कुख्यात गुंडाचा वरचष्मा आहे. त्यांच्या अजेंड्याला विरोध करणाऱ्या मंडळीविरुद्ध प्राणघात कट रसून अमलातही आणले जातात. हा इतिहास नजरसमोर असल्याने छत्रपतींच्या पराक्रमी इतिहासाचे विडंबन करण्यास विरोध करणारे संभाजी राजे यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. यामुळे छत्रपतींना सध्या असलेले वाय प्लस दर्जाचे संरक्षणाऐवजी झेड प्लस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या लेखकाची संतप्त प्रतिक्रिया

त्याचबरोबर संभाजीराजे छत्रपती यांच्या विरोधात कुणी आवाज उठविण्याच्या किंवा त्यांच्या जीवितास धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास गाठ आमच्याशी आहे, असा इशारा देखील सकल मराठा क्रांती मोर्चाने पत्रकाद्वारे दिला आहे.

मी जर उपमुख्यमंत्री असतो तर बाहेर पडलो असतो

 

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *