Nissan कंपनीची नवीन Juke कार भारतात होणार लॉन्च


वेगवान नेटवर्क

भारतीय बाजारपेठेत प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी निसानने आपली नवीन कार प्रदर्शित केली असून या कंपनीची नवीन कार Juke आपल्या डिजाइन आणि स्पोर्टीनेससाठी खासकरून युरोपियन बाजारपेठांमध्ये लोकप्रिय आहे. ही कार भारतात कधी लॉन्च होणार, याबाबत कंपनी अद्याप कोणतीही माहिती जाहीर केलेली नसून ही एसयूव्ही स्ट्रॉंग हायब्रीडसह येणार असल्याचा  दावा करण्यात आला आहे. चला तर आज आपण निसानच्या कंपनीची नवीन कार Juke बद्दल माहिती जाणून घेऊया.

AstroSage आजचे राशी भविष्यः या लोकांनी पैसा नाही वाचविल्यास पुढे खुप अडचणी येणार

या कारचा  लूक आणि स्टाईल खूप मस्त आहे. कारण ही एक कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. तर ही कार जवळजवळ कूप डिझाइन सारखी असून याला मस्क्यूलर लूक मिळतो. तसेच गोलाकार हेडलॅम्पसह शार्प कट दिसते, तर याची ग्रिल खूपच आकर्षक आहे. याचे केबिनचे लेआउटही पूर्णपणे नवीन डिझाइनमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे  या नवीन एसयूव्हीमध्ये अधिक बूट स्पेस ग्राहकांना मिळणार आहे. या कंपनीची ही कार फॉर सीटर आहे.

कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ

सध्या भारतीय बाजारपेठेत हायब्रीड तंत्रज्ञानाची वाढती मागणी लक्षात घेता ज्यूक हायब्रिड भारतासाठी चांगली एसयूव्ही ठरू शकते. यामध्ये 1.6L इंजिन 94hp पॉवर, 36kW (49hp) आणि 205Nm टॉर्क जनरेट करणारी इलेक्ट्रिक मोटर आहे. तर रेनॉल्टचे 15kW हाय व्होल्टेज स्टार्टर/जनरेटर प्लस इनव्हर्टर आणि Givesh1 पॉवर देतो. ही कार EV मोडमध्येही 80 टक्क्यांपर्यंत धावू शकते. ज्यामुळे मायलेज 40% पर्यंत वाढते.

तसेच यात सॉफ्ट टच मटेरियल, Alcantara सह स्पोर्टी सीट्स आणि 8-इंच टचस्क्रीन, अॅपद्वारे रिमोट कमांड, हेडरेस्टमध्ये स्पीकरसह आठ स्पीकर बोस ऑडिओ सिस्टम आणि इतर अनेक फीचर्स यात देण्यात आली आहेत. कंपनीने ही कार भारतात लॉन्च केल्यास, याला आयात करण्यात येणार आहे. ज्यामुळे याची किंमत कमी असू शकते. तर कंपनीने ही कार तीन प्रकारात लॉन्च केली असून लाला रंगात ही कार खूपच जबरदस्त वाटते. कंपनीने भारतात ही कार 7.87 लाख रुपयांच्या किमतीत लॉन्च केली.

ट्विटरमधून काढलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; एकाच वेळी मिळणार अनेक ऑफर्स

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *