वेगवान नाशिक
नाशिकः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर अपशब्द वापरून गलिच्छ भाषेत टीका करणाऱ्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जोडो मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी “५० खोके एकदम ओके”, इडी सरकार च करायचं काय खाली डोक वरती पाय, बेगानी शादी मे अब्दुला दिवाना यासारख्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.
AstroSage आजचे राशी भविष्यः या लोकांनी पैसा नाही वाचविल्यास पुढे खुप अडचणी येणार
तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी पुतळा ताब्यात घेतल्या वर सरकार हमसे डरती है पोलीस को आगे करती है या घोषणा आंदोलकांनी दिल्या. यावेळी कोंडाजीमामा आव्हाड, नानासाहेब महाले, अर्जुन टिळे, अनिता भामरे, अंबादास खैरे, निवृत्ती अरिंगळे, संजय खैरनार, बालम पटेल, धनंजय निकाळे, सलीम शेख, महेश भामरे आदि पदाधिकारी उपस्थित होते.
खुशखबर! महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया या तारखेपासून होणार सुरू, एवढे हजारांहून अधिक पदे भरणार
दरम्यान शिवसेनेविरोधात केलेल्या बंडखोरीनंतर शिंदे गटावर सातत्यानं ५० खोके घेतल्याचा आरोप केला जात आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही टीका केली होती. त्यानंतर सुप्रिया सुळेंच्या टीकेला राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अर्वाच्य भाषेत उत्तर दिल. याबाबत एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर सत्तार यांना प्रश्न विचारला असता या वाक्याचा सूड घेत सुप्रिया सुळेंच्या टीकेबद्दल शिंदे गटातले नेते अब्दुल सत्तार यांनी कॅमेरासमोरच अश्लील शब्दात उत्तर दिल.
त्यामुळे या अपशब्दाच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाली असून याचा निषेध म्हणून अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्यास जोडो मारो आंदोलन केले.
शिवसेना नेते अनिल परब यांची अडचण वाढणार?