नाशिकः जेलरोड परिसरातील भंगार दुकानाच्या गोदामाला भीषण आग


वेगवान नाशिक

नाशिकः गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात आगीचे तांडव पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये  एकामागे एक आग लागल्याच्या घटना घडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक धास्तावून गेले आहे. प्रशासनाने याबाबत गांभीर्याने लक्ष घालणे गरजेचे आहे.

AstroSage आजचे राशी भविष्यः या लोकांनी पैसा नाही वाचविल्यास पुढे खुप अडचणी येणार

अशातच नाशिकमध्ये (दि.८) पहाटेच्या सुमारास जेलरोड-एकलहरे रस्त्यावरील बोराडे चौकातील परिसरात एका भंगार दुकानामागील गोदामास अचानक भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे तेथील नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे.

त्यानंतर नागरिकांच्या सामुहिक सुचकतेमुळे अग्निशमन विभागाला तात्काळ कळविण्यात आले असून अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ

दरम्यान या घटनेतील दुकान मालक नाजीम शेख व तेथील असलेल्या नागरिकांनी दुकानातील शक्य तेवढे सामान बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

संभाजी भिडे गुरुजींच्या अडचणीत वाढ!

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *