वेगवान नाशिक
मनमाड : रेल्वेचे तिकिट मिळणेबाबत प्रवाशांच्या मनात संभ्रम असून प्रवाशांना सध्या रेल्वेच्या तिकिटांसाठी आरक्षण मिळण्याकरता वाट पहावी लागत आहे. अशातच रेल्वेच्या आरक्षित तिकिटांच्या बाबतीत एक धक्कादायक प्रकार समोर आला असून आरक्षित तिकिटांचा काळाबाजार होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
AstroSage आजचे राशी भविष्यः या लोकांनी पैसा नाही वाचविल्यास पुढे खुप अडचणी येणार
याबाबत माहिती अशी की, मालेगाव येथे अशरफ रशीद खान (३६) या ठकबाजाने आरक्षित तिकीटांचा काळाबाजार करत असल्याची मनमाडच्या रेल्वेच्या वाणिज्य विभागाला माहिती मिळाली असून संशयिताला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्याकडून विविध रेल्वे स्थानकांच्या आरक्षित १६ हजारांची तिकिटे जप्त करण्यात आली असून रेल्वेची मोठी कारवाई मानली जात आहे.
शिवसेना नेते अनिल परब यांची अडचण वाढणार?
दरम्यान मालेगाव येथे रेल्वे आरक्षित तिकिटांचा काळाबाजार करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती मनमाड येथील रेल्वे वाणिज्य विभागातील अधिकाऱ्यांना मिळताच या ठकबाजांना पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला असून त्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली असता त्याने तिकिटांचा काळाबाजार केली असल्याची कबुली दिली.
त्यानुसार तपास केला असता शहरातील पोस्ट ऑफिसमध्ये तिकीट आरक्षित करण्याची सुविधा असते. याची माहिती अनेकांना नसल्याने काही व्यक्ती याचा गैरफायदा घेत आरक्षित तिकीटांचा काळाबाजार करत असल्याचे समजले. तसेच ही तिकिटे आपण प्रवाशांना अधिक किमतीने विक्री करीत असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. तेव्हा त्याच्याकडे विविध स्थानकांची १६ हजारांची तिकिटे आढळून आली. त्यानंतर या संशयिताला ताब्यात घेतले असून मनमाडला आणले गेले व त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
शिवसेना नेते अनिल परब यांची अडचण वाढणार?