वेगवान नाशिक
राज्यातील राजकारणात सध्या सारखे एकमेकांवर वादग्रस्त विधान, वक्तव्य केली जात आहे. त्यामुळे नेत्यांनेत्यामधून संतप्त प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. यामुळे राज्यभर याचे प्रतिसाद उमटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
अशातच दोन दिवसांपूर्वी एका महिला पत्रकाराला प्रतिक्रिया देताना केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे संभाजी भिडे यांच्यावर चहुबाजूंनी टीका करण्यात आली. या प्रकरणाची दखल राज्याच्या महिला आयोगाने घेत संभाजी भिडे यांना नोटीस बजावली होती. मात्र, या नोटिसीला उत्तर देण्यात आलेले नसल्याने संभाजी भिडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
AstroSage आजचे राशी भविष्यः या लोकांनी पैसा नाही वाचविल्यास पुढे खुप अडचणी येणार
काही दिवसांपूर्वीच संभाजी भिडे यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीबाबत त्यांना एका खासगी वाहिनीच्या महिला पत्रकाराने विचारणा केली असता, ‘प्रत्येक स्त्री भारतमातेचे रूप आहे. भारत माता विधवा नाही. कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन,’ अशी प्रतिक्रिया भिडे यांनी दिली होती. त्यामुळे सर्वसामान्य महिलापासून ते राजकारणी महिला नेत्यांपर्यंत संतप्त प्रतिक्रिया देण्यात आल्या.
‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या लेखकाची संतप्त प्रतिक्रिया
त्यात राज्य महिला आयोगाने भिडे यांना नोटीस बजावली. पण याला कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे आता महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दुसरी नोटीस बजावली असून दिलेल्या मुदतीत त्यांनी आपली बाजू न मांडल्यास याप्रकरणी एकतर्फी निर्णय घेण्यात येईल, असे महिला आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
मी जर उपमुख्यमंत्री असतो तर बाहेर पडलो असतो