वेगवान नाशिक
शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. यावरून राज्यात वाद पेटला. सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.
या आक्षेपार्ह व्यक्तव्यावरून आदित्य ठाकरे यांनी सत्तार यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. पुढे त्यांनी देवेंद्र फडणविसांनी फडणवीस यांनाही लक्ष केले आहे. देवेंद्र फडणवीस यांचं नाव अशा विधानांमुळे खराब होत आहे.
मी जर उपमुख्यमंत्री असतो तर बाहेत पडलो असतो, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना लक्ष केलं आहे.
राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानावर आदित्य ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ‘हे घटनाबाह्य कृषी मंत्री आक्षेपार्ह विधान करतात. असलं घाणेरडे मी सांगू पण शकणार नाही. असे घाणेरडे बोलणारे कृषिमंत्री तुम्हाला हवेत का ? असे लोक तुम्हाला पक्षात हवेत का? असा प्रश्न करत आदित्य ठाकरेंनी अब्दुल सत्तारांसह शिंदे गटावर निशाणा साधला आहे.