वेगवान नाशिक
मुंबईः काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून पोलीस भरती जाहीर करण्यात आली होती. मात्र काही कारणाखातर ती स्थगित करण्यात आली होती. परंतु आता सरकारने राज्यातील तरुणांसाठी आनंदाची बातमी आणली असून पोलिस भरतीची प्रक्रिया सुरु होणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच यामध्ये सुमारे 18 हजार331 पदांवरील पोलीस भरती सुरू होणार असल्याची माहिती राज्य सरकारतर्फे देण्यात आली आहे.
AstroSage आजचे राशी भविष्यः या लोकांनी पैसा नाही वाचविल्यास पुढे खुप अडचणी येणार
याकरता 9 नोव्हेंबरपासूनच पोलीस भरतीसाठी उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेतले जाणार आहेत. यानंतर आधी शारीरीक चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
तसेच गृहविभागाने या उमेदवारांकरिता मोठा निर्णय घेतला असून या उमेदवारांना पोलीस भरतीची संधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे कोरोना काळात अर्ज केलेल्या आणि ज्यांची वयोमर्यादा समाप्त झाली आहे, अशा उमेदवारांना पोलीस भरतीत संधी मिळणार आहे.
मी जर उपमुख्यमंत्री असतो तर बाहेर पडलो असतो
राज्य सरकारतर्फे महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी महत्वाच्या जाहीर सूचना देण्यात आल्या आहेत. जसे की उमेदवारांनी अर्ज भरतेवेळी फक्त एकाच पदासाठी एकच अर्ज करू शकतात. 1- संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस शिपाई चालक या पदासाठी एकच अर्ज करावा. 2 – संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस शिपाई या पदासाठी एकच अर्ज करावा. 3 – संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यातील कोणत्याही ‘रा. रा पोलीस शिपाई’ या पदासाठी एकच अर्ज करावा. 4 – संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस शिपाई लोहमार्ग या पदासाठी एकच अर्ज करावा. तसेट-वरील क्र-1/क्र-2/क्र-3/क्र-4 असे चार अर्ज एक उमेदवार करू शकतो. याप्रमाणे सूचना दिल्या आहेत.
आरबीआयकडून एटीएममधून रक्कम काढण्याबाबत महत्त्वाचा अलर्ट