वेगवान नाशिक

पंचवटी : NASHIK नाशिककरांना उत्सव काळात खंडग्रास चंद्र ग्रहण मंगळवारी अनुभवता आले. याप्रसंगी रामकुंडावर असंख्य भाविकांनी सुमारे अडीच तीन तास पाण्यात बसून नामजप करीत पूजाअर्चा केली . यामध्ये महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती . सायंकाळी सूर्यास्त झाल्यानंतर या भाविकांनी स्नान करून मंदिरांमध्ये दर्शसनासाठी गर्दी केली होती . Crowd of devotees at Ramkunda during eclipse!
खंडग्रास चंद्र ग्रहण भारतीय वेळेनुसार दुपारी २:४१ वाजता सुरू झाले आणि ६:२० वाजता संपले . त्याचा मोक्ष कालावधी ७ : २५ वाजेपर्यंत होता . हे चंद्रग्रहण भारतात संध्याकाळी ५ : २० पासून चंद्रोदयासह दिसले आणि ६:२० वाजता चंद्रास्तासह समाप्त झाला . त्याचा सुतक काळ भारतात वैध मानण्यात आला होता . नाशिकच्या वेळेनुसार मंगळवार दि ८ रोजी संध्याकाळी ५:५६ ते संध्याकाळी ६:१९ या वेळेत अनेक भाविकांनी स्वतःच्या कुलदेवतेचा रामकुंडात गोदावरीच्या पाण्यात बसून तसेच आजूबाजूच्या अनेक मंदिरांमध्ये मंत्रजप सुरू सुरु ठेवले होते .
ग्रहण ही नैसर्गिक क्रिया असली तरी तिचे धार्मिक महत्व अधिक आहे. दुपारी अडीच वाजेनंतर शेकडो भाविकांनी रामकुंडावर ग्रहण काळात गर्दी करायला सुरुवात केली होती. हे भाविक लक्ष्मण कुंड, रामकुंड, धनुष कुंड, सीता कुंड ते दुतोंडया मारुती सांडव्यापर्यंत गोदावरी नदीच्या दोन्ही काठांवर छातीपर्यंत पाण्यात उभे राहून तर काहीजण पाण्यात बैठक मारून नामजप करीत होते. या भाविकांनी स्नानासाठी गोदेच्या पाण्यात डुबकी मारली. यानंतर गोरगरिबांना विविध प्रकारचे दान करण्यात देऊन देवदर्शन करीत परतीचा मार्ग धरला .