वेगवान नाशिक
चित्रपटगृहात बसलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावल्याने वादाचे प्रसंगही घडले. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
ऐतिहासिक चित्रपटांमध्ये इतिहासांची मोडतोड केली जात असल्याचे आरोप माजी खासदार संभाजीराजे यांनी केला होता.
त्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. अशातच काल राष्ट्रवादीने आक्षेप घेत ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये चित्रपटाच्या चालू शोमध्ये राडा केला.
यासर्व प्रकारावर ‘हर हर महादेव’ चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी राज ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
ठाणे येथील हर हर महादेवच्या शो मध्ये घुसून सामान्य मराठी प्रेक्षकावर भ्याड हल्ला केल्याबद्दल हर हर महादेवची पूर्ण टीम ह्या विकृत गुंडांचा निषेध करते. माझ्या छत्रपतींवर राजकारण खेळणं बंद करा आणि त्यांचे दैवी विचार आचरणात आणा. खरी शिवभक्ती काय असते हे राजसाहेब ठाकरेंकडून शिका.