वेगवान नाशिक
शेअर बाजारात आपल्याला चढ-उतारीचे सत्र सारखे खाली वर होताना दिसत असतात. त्यात गेल्या अनेक दिवसांपासून बाजारात सातत्याने पडझड पाहायला मिळत होती. मात्र, आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात चांगली सुरूवात झाली असून बाजाराची सुरुवात हिरव्या चिन्हावर झाली. त्यामुळे दोन्ही निर्देशांकांनी चांगली आघाडी घेतली आहे.
तर सेन्सेक्स आणि निफ्टी दोघांनीही चांगली तेजी दिसून येत असून सेन्सेक्स 101 अंकाच्या तेजीसह 61,059 वर सुरू झाला तर निफ्टी 63 अंकाच्या तेजीसह 18,181 वर सुरू झाला. तसेच बाजारात आज आपण पाहिले तर जवळपास अर्धा टक्का वाढ झाल्याचे दिसून आलं असल्याचे अजित मिश्रा म्हणाले आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना जुन्या गुंतवणुकीतून होणार फायदा
तसेच युरोपीय बाजारातील रिकव्हरी आणि आशियाई बाजारातील तेजीमुळे भारतीय बाजारांमध्ये उत्साह दिसून आल्याचे कोटक सिक्युरिटीजचे अमोल आठवले यांनी सांगितले. तसेच यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था जागतिक आव्हानांपासून पूर्णपणे संरक्षित नसली तरी, अलीकडील मजबूत जीएसटी डेटा आणि आयआयपी क्रमांक येत्या काळात परिस्थिती सुधारू शकते असे संकेत देत आहेत.
दुसरीकडे, भारतीय बाजाराबद्दल बोलायचे तर आज बँक निफ्टीमध्ये मजबूत वाढीसह व्यवसाय सुरू झाला आहे आणि सर्वकालीन उच्चांकाच्या जवळ पोहोचला आहे. आज रुपयाची सुरुवातही मजबूत झाली असून ३३ पैशांच्या वाढीसह उघडला आहे. रुपयाच्या सुरुवातीच्या व्यापारात ८२.११ रुपये प्रति डॉलरची पातळी दिसून आली.
Twitter ‘“ट्विटर तेरे टुकड़े होंगे, गैंग को भी 8 डॉलर देने पड़ेंगे”