वेगवान नाशिक
मुंबईः अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अपशब्द भाषेत टीका केली आहे. त्यामुळे राजकारणात वातावरण चांगलेच तापल आहे. यावर राज्यभर राष्ट्रवादीकडून सत्तारांविरोधात निदर्शने केली जात आहेत. त्यामुळे वाढता विरोध पाहून अखेर सत्तारांनी आपले शब्द मागे घेतो असे म्हटले आहे.
सत्तार म्हणाले की, मी कोणत्याच महिलेविरोधात अपशब्द बोललो नाही. आणि मी जे बोलले ते आम्हाला बदनाम करत आहेत त्यांच्याबद्दल बोललो. सुप्रिया सुळे.. किंवा कोणत्याही महिलेचं मनं दुखवेल असा कोणताही शब्द मी बोललो नाही, जर कोणत्या महिलांना वाटत असेल मी आक्षेपार्ह बोललो, आणि त्यांची मनं दुखावली तर मी जरूर खेद व्यक्त करतो.
तसेच जे खोक्यांचा आरोप करत आहेत त्यांना मी बोललो, मात्र माझ्या बोलण्याचा अर्थ महिलांबाबत काढत आहेत. मी महिलांचा सन्मान करणारा कार्यकर्ता आहे. असे म्हणत सत्तारांनी माघार घेतली.