वेगवान नाशिक
मनमाड : यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे खूुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसाने सर्वत्रच नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र राज्य सरकार अजून काही ओला दुष्काळ जाहीर करायचं नाव घेऊना. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला असून हताश झाला आहे. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर पंचनाम्यांचा धडाका हे नाटक असल्याचा जोरदार घणाघात केला आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना जुन्या गुंतवणुकीतून होणार फायदा
त्यानंतर राजू शेट्टी म्हणाले की, शेतक-यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून रब्बीला उशीर झाल्याने वर्ष कसे काढायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता सरकारने पंचनाम्यांचे नाटक बाजूला ठेवून ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे. व लवकरात लवकर शेतक-यांना मदतीचा हात देणे अपेक्षीत आहे.
आर्थिक आरक्षणाच्या निर्णयावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
तसेच प्रशासनावर आणि विमा कंपन्यांवर सरकारचा वचक राहिलेला नसून त्यांना कोट्यवधींचा नफा होत आहे. आणि ज्यांना विम्याची रक्कम द्यायला पाहिजे होती ती देखील दिली नाही. तसेच ऊस मोजताना काटामारीत सुमारे ४ हजार ६०० कोटी रुपयांचा काळा पैसा तयार होतो. हा काळा पैसा निवडक दोनशे साखर कारखानदारांच्या घरात जात असल्याचा गंभीर आरोप शेट्टी यांनी केला आहे. त्यानंतर साखर आयुक्तांच्या कार्यालयावर राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोर्चा काढणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
अंधेरी पोटनिवडणुकीच्या निकालावरून, ठाकरे गटाचा भाजप, शिंदे गटावर हल्लाबोल