बीएसएनएलचा जबरदस्त प्लान, २००० GB डेटासह Disney + Hotstar फ्री


वेगवान नेटवर्क

नवी दिल्ली:  तुम्ही जर बीएसएनएल युजर असाल तर, या प्लानचा नक्कीच विचार करा. कारण यामध्ये तुम्हाला अनेक जबरदस्त फायदे दिले जात आहेत. बरेच जण हे रिचार्ज प्लान्सच्या शोधात असतात की कोणती कंपनी चांगले प्लान ऑफर करत आहे. म्हणूनच तुमच्याकरता बीएसएनएल  खास प्लान घेऊन आलं आहे. चला तर या प्लान बद्दल जाणून घेऊया.

रिचार्ज प्लान्सच्या बाबतीत बीएसएनएल कंपनी अनेक ठिकाणी मागे असली तरी, कंपनी ब्रॉडबँड प्लान्ससह जबरदस्त फायदे ऑफर करते. त्यात बीएसएनएलने यूजर्सना अनेक फायदे दिले जातील असा प्लान आणलाय. त्यामध्ये  कंपनी  OTT फायदे देखील देते.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना जुन्या गुंतवणुकीतून होणार फायदा

प्लानची किंमत ७७५ रुपये

BSNL च्या या ब्रॉडबँड प्लानची किंमत ७७५ रुपये आहे. यामध्ये तुम्हाला बीएसएनएल भारत फायबरकडून ७५ दिवस सेवा दिली जाईल. नमूद केल्याप्रमाणे, ही एक प्रमोशनल ऑफर आहे. म्हणजेच याचा फायदा घेण्यासाठी त्वरीत सदस्यत्व घ्यावे लागेल. भारत संचार निगम लिमिटेड  5G किंवा 4G सेवेत खाजगी टेलिकॉम कंपन्यांपेक्षा खूप मागे आहे. पण, अनेक ब्रॉडबँड योजनांच्या बाबतीत रिलायन्स जिओ आणि एअरटेलच्या पुढे आहे.त्यामुळे युजर्सना परवडणाऱ्या किमतीत अनेक फायदे मिळतील.

अहवालानुसार, BSNL कंपनीचा हा प्रमोशनल ब्रॉडबँड प्लान १५ नोव्हेंबर २०२२ पासून बंद होणार आहे. याआधी तुम्ही याचे सदस्यत्व घेऊ शकता.  यामध्ये यूजर्सना 2TB मासिक डेटा मिळेल तसेच यानंतर डेटा स्पीड १० Mbps पर्यंत कमी होईल. म्हणजेच, तुम्ही एका महिन्यात 2TB पर्यंत हाय स्पीड डेटाचा लाभ घेऊ शकता.

BSNL च्या या प्लॅनसह, युजर्सना Sony LIV, ZEE5, Voot, Hungama, Shemaroo, Lionsgate, Disney + Hotstar आणि Yupp TV सारख्या OTT प्लॅटफॉर्मवर मोफत सबस्क्रिप्शन देखील दिले जाते. त्यामुळे तुम्ही स्वस्त ब्रॉडबँड प्लान घेण्याचा विचार करत असाल तर, तुम्ही बीएसएनएलच्या या प्लानचा नक्कीच विचार करू शकता.

आर्थिक आरक्षणाच्या निर्णयावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *