या पिकाची लागवड करून तुम्ही होऊ शकता मालामाल


वेगवान नाशिक

नवी दिल्लीः जर तुम्हीही एखादा अनोखा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक माहिती घेऊन आलो आहोत. सध्या आजकाल लोक शेतीकडे वळू लागले असून अशा परिस्थितीत तुम्ही शेतीतूनही भरघोस उत्पन्न मिळवू शकता. तर आज आम्ही तुम्हाला अशा उत्पादनाबद्दल सांगणार आहोत जे तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडतील.

आम्ही तुम्हाला सांगतो की, काळी हळद सर्वात महाग विकल्या जाणार्‍या उत्पादनांपैकी एक आहे. अनेक औषधी गुणधर्मांमुळे बाजारात काळ्या हळदीची किंमत खूप जास्त आहे. त्यामुळे या काळ्या हळदीच्या लागवडीतून तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. चला तर आज आपण येथे जाणून घेणार आहोत काळ्या हळदीची लागवड कशी केली जाते आणि त्यापासून कसा फायदा होतो.

astrosage आजचे राशी भविष्यः तुम्ही आजच सावध व्हा पुढे फार कठीण

काळ्या हळदीच्या लागवडीसाठी भुसभुशीत चिकणमाती चांगली मानली जाते. त्यामुळे शेती करताना पावसाचे पाणी शेतात साचणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच एका हेक्टरमध्ये सुमारे २ क्विंटल काळ्या हळदीचे बियाणे लावले जाते. तर जून महिना त्याच्या लागवडीसाठी चांगला मानला जात असून या पिकाला जास्त सिंचनाची आवश्यकता नसते.

तसेच या पिकासाठी कोणत्याही प्रकारच्या कीटकनाशकाचीही गरज भासत नाही. मात्र, चांगल्या उत्पादनासाठी हळदीच्या लागवडीपूर्वी शेणखत चांगल्या प्रमाणात टाकल्यास उत्पादन चांगले मिळते. काळी हळद हे औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध असल्याने  आयुर्वेद, होमिओपॅथ आणि अनेक महत्त्वाची औषधे बनवण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यामुळे कोविडनंतर त्याची मागणी खूप वाढली आहे.

या काळ्या हळदीचा भाव 500 ते 4000 रुपये किंवा त्याहून अधिकपर्यंत पोहोचतो. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सध्या काळी हळद मिळणे फार कठीण आहे. तर काळ्या हळदीच्या लागवडीत उत्पादन कमी असू शकते, परंतु त्याची किंमत खूप जास्त आहे. त्यामुळे काळ्या हळदीची लागवड करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.

Health जर तुमची झोप पूर्ण होत नसेल तर तुम्हाला होईल हा आजार


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *