ठाकरे गटाच्या नेत्याकडून अब्दुल सत्तारांवर जोरदार टिकास्त्र


वेगवान नाशिक

मुंबई : राज्यात पक्षांच्या वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेण्याचे काम सुरू असून राष्ट्रवादी कॅाग्रेस, शिवसेना, भाजप यांच्या वेगवेगळ्या भागात सभा होत आहेत.या सभेमधून एकमेकांवर टिका टिप्पणी केली जात आहे. मात्र याचे प्रतिसाद राज्यभर उमटताना दिसत आहे. त्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे.

astrosage आजचे राशी भविष्यः तुम्ही आजच सावध व्हा पुढे फार कठीण

अशातच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या जळगाव आणि सिल्लोड येथील सभेंना परवानगी न दिल्याने चांगलेच वातावरण चिघळले आहे. तसेच आदित्य ठाकरे यांच्या सभेचा धसका शिंदे गटाने घेतल्याने सत्ताधाऱ्यांनी सभा नाकारण्याचे षडयंत्र सुरू केल्याचे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे. तर यामुळेच सभेलाही परवानगी नाकारली गेली असा सवाल शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे.

दरम्यान आदित्य ठाकरे जळगाव, बुलढाणा दोऱ्यावर आहेत. त्यांची संवाद यात्रा सुरू असल्याने ते विविध ठिकाणी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागांना भेट देणार असून अनेक ठिकाणी संवाद साधणार आहेत. यावर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी बोलताना अब्दुल सत्तार यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी अब्दुल सत्तार यांना हिरवा साप अशी उपमा दिली आहे.

Health जर तुमची झोप पूर्ण होत नसेल तर तुम्हाला होईल हा आजार

त्यानंतर खैरै म्हणाले की, आदित्य ठाकरे हे संवाद यात्रेच्या निमीत्ताने राज्यभर दौरे करत आहेत. यामुळे त्यांची सभा नसून संवाद आहे. ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधणार आहेत, त्यामुळे त्यांच्या सभेचा विषय नाही. पण सत्तार आता काहीही बडबड करत फिरत आहे. त्यामुळे त्याच तोंड आम्हीच बंद करणार, तो सरडा आहे, हिरवा साप आहे, तो घाबरत होता मला, आता मंत्री झाला म्हणून उडतोय अशी खरमरीत टीका खैरे यांनी केली आहे.

तसेच 2024 मध्ये 400 खासदार निवडून येईल असे चंद्रकांत पाटील म्हणाले, मात्र प्रत्यक्षात देशाचे वातावरण बदलत आहे. प्रादेशिक पक्ष जागे झाले आहेत, भाजपला इतकं यश मिळणार नसल्याचेही ते म्हणाले, तसेच ठाकरे घराण्याला कुणीही आव्हान देऊ शकत नाही. सत्तार हा हिरवा साप आहे तो वातावरण खराब करतोय त्याला आम्ही ठेचणार असल्याचेही खैरे म्हणाले.

सीएनजी पीएनजीच्या दरात वाढ

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *