वेगवान नाशिक
जगात सध्या फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मोबईल फोनमुळे बरेच जण सोशल मिडियाचा जास्त वापर करताना दिसतात. त्यात काहीजण फसवणूकीला बळी पडतात.असाच काहीसा प्रकार घडला असून शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाला बळी पडून एकाची फसवणूक झाली आहे.
या प्रकरणी एका तरूणाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांकडून चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
astrosage आजचे राशी भविष्यः तुम्ही आजच सावध व्हा पुढे फार कठीण
फिर्यादीनुसार, तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी एक लिंक पाठविली होती. त्यात शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास नफा मिळेल, असे आमिष तरुणाला दाखविण्यात आले होते. त्यानंतर चोरट्यांनी तरुणाकडून ऑनलाइन कागदपत्रे मागवून त्याद्वारे एका बँकेत डिमॅट खाते उघडले.
त्यानंतर चोरट्यांनी तरुणाला वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. या तरुणाने वेळोवेळी एक लाख ४८ हजार रुपये जमा केले. मात्र त्याला कोणत्याही प्रकारचा परतावा देण्यात आला नाही. म्हणून तरूणाने चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा त्यांनी त्याला उडवाउडवीची उत्तरे दिली असता फसवणूक झाली असल्याचे तरूणाच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार दिली असून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे पुढील तपास करत आहेत.
Health जर तुमची झोप पूर्ण होत नसेल तर तुम्हाला होईल हा आजार