Nashik नाशिकरोडला शालीमार एक्सप्रेसच्या डब्याला आग


वेगवान नाशिक

नाशिकः जिल्ह्यात सध्या आगीच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहे. अशातच नाशिकरोड रेल्वे स्थानकावर हावडा मेलला आग लागण्याची घटना घडली आहे. दरम्यान रेल्वे स्टेशनला गाडी थांबली असता अचानक ही आग लागल्याची घटना घडल्याचं सांगितल जात आहे.

Health जर तुमची झोप पूर्ण होत नसेल तर तुम्हाला होईल हा आजार

याबाबत मिळालेल्या माहितीतून नाशिकरोड रेल्वे स्थानकावर हावडा एक्सप्रेस थांबली होती त्यावेळी हावडा मुंबई शालिमार एक्सप्रेस मधील कपड्याच्या बोगीला आग लागली असून आगीमुळे स्थानकावर धुराचे लोट पसरले आहे. त्यानंतर गाडीतील प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आलं असून, नाशिक अग्निशमन दलाचे बंब रेल्वे स्थानकाकडे रवाना होईन आग नियंत्रणात आणली आहे.

astrosage आजचे राशी भविष्यः तुम्ही आजच सावध व्हा पुढे फार कठीण

दरम्यान नाशिक रोड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर हावडा बोगीला एक्सप्रेस नाशिकरोड रेल्वे स्थानकात पोहचताच आग लागली. या घटनेमुळे स्टेशन परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. मात्र सुदैवाने  या आगीत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

या तारखेपासून लष्करात महिला अग्निवीरांची भरती

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *