मालेगावः यंत्रमाग कारखान्यांना भीषण आग, लाखोंचं नुकसान


वेगवान नाशिक

मालेगाव : नाशिक जिल्ह्यात आगीच्या घटनाचे सत्र सुरूच आहे. काही थांबायचे नाव घेईना. जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात अशीच धक्कादायक मोठी दुर्घटना घडली असून तालुक्यातील द्याने शिवारात यंत्रमाग कारखान्यांना भीषण आग लागल्याचं समोर आलं आहे.

astrosage आजचे राशी भविष्यः तुम्ही आजच सावध व्हा पुढे फार कठीण

मिळालेल्या  माहितीवरून, सदर घटना पहाटेच्या सुमारास घडली असून या आगीमध्ये लाखोंचं नुकसान झालं आहे. या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्र्यांनी घटनास्थळी धाव घेत ही आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान या घटनेत अनेक यंत्रमाग कारखान्यांना आगीने भक्षस्थानी घेतलं असून याबाबत काही व्हिडिओही समोर आलेत ज्यामध्ये आगीचे लोट पाहायला मिळत आहे. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच येथील आग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहचले असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे.

या तारखेपासून लष्करात महिला अग्निवीरांची भरती

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *